संध्या एदलाबादकर - लेख सूची

शाळा ते लोकशाळा- एक विचार

महात्मा ज्योतिबा फुले यांनी १९व्या शतकात समाजातील वंचितांची विद्येविना कशी स्थिती झाली याविषयी लिहिले होते,  विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेलीनीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेलेवित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ अविद्येने केले  महिला, अस्पृश्य व मागासवर्गीय यांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी सनातनी लोकाचा विरोध, शिव्याशाप, बहिष्कार सहन केले व हजारो वंचितांना मुक्तीचा मार्ग दाखविला. त्यानंतरच्या …

कोविद महामारीचे रोजगार व उत्पन्न यावर झालेले परिणाम

चीनच्या वूहान शहरातून २०१८मध्ये सुरुवात झालेल्या कोविदची लाट जगभरात पसरली. जगभरात १५ जून २०२१ पर्यंत १७.७ कोटी लोक बाधित झाले व ३८.४ लाख लोक मरण पावले. कोविदचा सामना करण्यासाठी बहुतेक देशातील आरोग्ययंत्रणांवर प्रचंड ताण आला. हा विषाणू नवीन असल्याने व तो मानवी शरीरावर कसा परिणाम करतो, याविषयी माहितीचा अभाव होता. कोणती औषधे यावर प्रभावी ठरतील याविषयी …

ते विवादास्पद तीन शेती कायदे

केंद्रसरकारने कृषी संदर्भात जे नवीन कायदे केले आहेत, त्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले आहे. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत असा सरकारचा दावा आहे व काही अर्थतज्ज्ञांचापण त्यास पाठिंबा आहे. मात्र बहुसंख्य शेतकरी संघटनांचा यास विरोध आहे. हे कायदे अंबानी, अदानी यांसारख्या बड्या भांडवलदारांना शेतीव्यवसायात शिरकाव करणे सोपे व्हावे म्हणून केले आहेत व शेती व शेतकरी यांच्या …

शेतीक्षेत्रातील महिलांच्या सबलीकरणासाठी स्वयंसहाय्य गट

भारतात कामकरी महिलांपैकी ८०% महिला शेतीत व संलग्न व्यवसायात आहेत. शेती, पशुपालन, वनीकरण, मासेमारी या व्यवसायात शेतकरी, मजूर, किरकोळ विक्रेते म्हणून त्या काम करतात. या महिला सामाजिक, आर्थिक, राजकीय व आरोग्य या दृष्टीने सर्वात जास्त वंचित आहेत. या महिलांचे सबलीकरण करून त्यांचा विकास करणे हे फार मोठे आव्हान आहे. आर्थिक स्थिती- शेतीमध्ये महिला पेरणी, रोवणी, …

शेती-शेतकरी : अनुभव आणि आकलन

शेती व शेतकरी ह्यांच्यासामोरील अरिष्ट नेमके काय आहे ह्या प्रश्नाची उकल प्रत्यक्ष अनुभव व आकडेवारी ह्यांच्या साह्याने करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासोबतच तो आजच्या परिस्थितीत नेमके काय केले असता शेतकऱ्यांच्या स्थितीत सुधारणा व शेतीचा विकास होईल हेदेखील सुचवितो. —————————————————————————– शेती व शेतकऱ्यांची दारुण परिस्थिती (विशेषतः शेतकऱ्यांच्या आत्महत्या) हा गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवरील एक चिंतेचा …